नाशिककरांच्या मनातून उतरली मनसे

January 28, 2009 3:01 PM0 commentsViews: 7

28 जानेवारी, नाशिक दीप्ती राऊतमनसेचा बालेकिल्ला अशी नाशिकची ओळख बनत होती. पण त्या ओळखीला तडा मनसेनंच दिला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर सर्वात जास्त फटका बसला तो नाशिककरांना. कारण मनसेनं नाशिकचा विकास करण्याऐवजी नाशिक करांची पिच्छेहाट केली आहे. मग धाररावांचा मृत्यू असो वा इंडस्ट्रीतला लेबर प्रॉब्लेम… नाशिककरांच्या मनसेकडूनच्या अपेक्षांची जागा आता अपेक्षाभंगानं घेतलीये. ' नाशिकच्या महापालिकेत शिवसेनेला निवडून आणा, शिवसेना नाशिकचा कायापालट करेल, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. तेव्हा मनसेची स्थापनाही झाली नाही. पण जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा नाशिकची सत्ता मनसेच्या ताब्यात गेली. पण त्या बदल्यात मनसेने नाशिककरांना काय दिलं… तर दारुण अपेक्षाभंग. औरंगाबाद, नागपूरसारखे जिल्हे नाशिकच्या पुढे गेले आहेत. नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास होणं गरजेचं आहे. तेच होत नाहीये. त्यामुळे लोकांच्या मनातही मनसेबद्दल नाराजी आहे. नाशिकमध्ये स्मॉलस्केल युनिट चालवणार्‍या अभय कुलकर्णींच्या राज ठाकरेंकडून खूप वेगळ्या अपेक्षा होत्या. " राजसाहेबांनी मनसे स्थापन केली तेव्हा नाशिककरांच्या खूप वेगळ्या अपेक्षा होत्या… आज नाशकात स्कॉर्पीयो आली त्याचे क्रेडीट त्यांनाच जातं. कारण मी स्वत: त्यात इव्हॉल्व्ह होतो, " असं उद्योजक अभय कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. " पण आता त्यांच्या सोबत जे लोक येताहेत मनसेच्या बॅनरखाली ते गुंडप्रवृत्तीचे आहेत. गुंडगिरी करून महाराष्ट्रीयन माणसाला न्याय मिळणं शक्य नाही.. मराठी माणूस घबरट आहे असं नाही. पण ते मारताहेत कोणाला तर गरीब, रोजावर काम करणा-यांना तेच चुकीचं आहे, " असं नाशिकच्या स्थानिकांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंना सर्वाधिक आधार देणारं नाशिकच मनसेच्या हिंसक कारवायांचं लक्ष्य होतंय. प्रजासत्ताक दिनानिमत्तानं आयोजीत भोजपुरी कार्यक्रमावर त्यांनी केलेल्या हल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. " प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मनसेच्या लोकांनी केलेली हुल्लडबाजी योग्य नाहीये. संगीत लोकांना जोडण्याचं काम करतं. परवाचा प्रकार लज्जास्पद आहे, " असं कलाकार कन्याकुमारी गुणे म्हणाल्या. " मनसेची स्थापना करताना त्यांच्यापुढे असलेल्या उद्दिष्टांपासून पक्ष दूर चालला आहे. मन विषण्ण होतं. मराठी माणूस एवढा इनसेक्यूर कधीच नव्हता. एक परप्रांतीय घेवून जाईल ही भीती मराठी माणसाच्या मनात कधीपासून निर्माण झाली. जे राज ठाकरेंच्या मनात आहे ते साध्य होणार नाही… उद्दीष्ट्य एक असलं तरी पॉलिसी आणि एक्झेक्युशन चुकीचं आहे, " असं शंतनु गुणे म्हणाले. अनेकांना वाटतंय. विचार बरोबर आहे, पण कृती चुकतेय. " मनसेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा स्थापन झाली तेव्हा वाटलेलं हा एज्युकेटेड लोकांचा ग्रुप आहे, वेगळं घडेल अशी अपेक्षा होती.. मुद्दे चांगले होते, मात्र पद्धत चुकीची वापरताहेत. एज्युकेटेड ग्रुप कडून अशी अपेक्षा नव्हती. दहशत बसवून ही कामं होत नाहीत, " असं उद्योजक शुभा देसाई म्हणाल्या. नाशिकनं राज ठाकरेंना खूप प्रेम दिलं. पण त्याच्या बदल्यात नाशिककरांनाच मनसेचे जास्त फटके बसलेत.

close