अमेरिकन तरुणीवर हल्ला करणार्‍या हल्लेखोराचं स्केच प्रसिद्ध

August 19, 2013 9:36 PM0 commentsViews: 462

halekhor19 ऑगस्ट : मुंबईत लोकलमध्ये अमेरिकन तरुणीवर हल्ला करणार्‍याचं पोलिसांनी स्केच प्रसिद्ध केलं आहे. हल्ला झाला त्यावेळी लोकलमध्ये सुरक्षारक्षक नव्हता अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

या हल्ल्याप्रकरणी 28 जणांची चौकशी करण्यात आली. मिशेल मार्क या तरुणीवर रविवारी हल्ला झाला होता. मरिन लाईन्स स्टेशनवर एक मुलगा लेडीज डब्यात शिरला आणि त्यानं 26 वर्षांच्या मिशेलच्या गळ्यावर आणि गालावर ब्लेडनं अनेक वार केले आणि तिचा मोबाईल हिसकावून पळून गेला. लो

कलमध्ये महिलांवर हल्ला होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात वाढलंय. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय.

close