पाकचा सीमारेषेवर पुन्हा गोळीबार

August 19, 2013 9:58 PM0 commentsViews: 502

Image img_227742_locboradarpakvsindia_240x180.jpg19 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा गोळीबार केलाय. 5 ऑगस्टपासून पाकिस्ताननं एलओसीवर अनेक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. आजही दुपारी अडीचच्या सुमाराला पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पूंछ जिल्ह्यातल्या मेंढार सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला.

 

तसंच स्वातंत्र्य दिनाच्या रात्री पाकिस्तानकडून झालेल्या घुसखोरीचं सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध करण्यात आलंय. भारतीय सैन्याची सीमेवर देखरेख ठेवणार्‍या थर्मल यंत्रणेतून ही दृश्यं टिपण्यात आली आहे. यात घुसखोर सीमारेषेवरून गुपचूप भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. पण, भारतीय लष्करानं गोळीबार करून या घुसखोरांना हुसकावून लावलं.

 

दरम्यान, भारताच्या पाच जवानांनी हत्या पाकिस्तानच्या सैन्यानं केली असून पाक लष्कराच्या एका विशेष पथकाचा या हल्ल्यामध्ये हात होता असं स्पष्टीकरण संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी राज्यसभेत दिलं. या घटनेचा परिणाम नियंत्रण रेषेवर भारतीय जवानांच्या वर्तनावर होईल असा इशाराही अँटनी यांनी पाकला दिला. 5 ऑगस्ट रोजी पाक सैनिकांनी नियंत्रण रेषेवर घुसखोरी करून गोळीबार केला होता. या गोळीबारात 5 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. याबाबत आज संरक्षण मंत्री ए के अँटनी यांनी राज्यसभेत माहिती दिली.

close