ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं निधन

August 20, 2013 12:55 PM0 commentsViews: 768

jayant salgaonkar20 ऑगस्ट : कालनिर्णयकार ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्रकृती खालावली. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कालनिर्णयमुळे ते घराघरांमध्ये पोहोचले होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात साळगावकर यांना महत्त्वाचं स्थान होतं. ज्योतिर्भास्कर साळगावकर महाराष्ट्रात भाऊ म्हणून प्रसिद्ध होते. भाऊंचं सर्वात मोठं यश म्हणजे राज्यातल्या लाखो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना एकत्र आणून त्यांची संघटना बांधली.

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती महाराष्ट्राचे ते अध्यक्ष देखील होते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच गणेशोत्सवात सुसूत्रता आली. सामाजिक आणि सांस्कृतिक तसंच राजकीय क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे त्यांच्याकडे वडिलकीच्या नात्यानं पहायचे. 1973 पासून कालनिर्णयाला सुरूवात झाली. ते ज्योतिषतज्ज्ञ तर होतेच, पण लेखक आणि यशस्वी उद्योजकही होते.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचा अल्प परिचय

  • जन्म – 1 फेब्रुवारी 1929
  • मालवण, सिंधुदुर्ग
  • ————————
  • - मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक आणि उद्योजक म्हणून ओळख
  • - 9 भाषांतून निघणार्‍या कालनिर्णय या वार्षिक दिनदर्शिकेचे संस्थापक-संपादक
  • - ‘धर्म-शास्त्रीय निर्णय’ या ग्रंथाचे संपादन आणि लेखन
  • - विविध सामाजिक, ऐतिहासिक आणि धार्मिक
  • - विषयांवर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध

 

close