श्रीलंकन सरकारचं आवाहन जयललितांनी धुडकावलं

January 28, 2009 4:55 PM0 commentsViews: 2

28 जानेवारी लिट्टेला शरण येण्यासाठी मध्यस्थी करण्याचं श्रीलंकन सरकारचं आवाहन अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी धुडकावून लावलंय. जयललिता आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांनी लिट्टेबरोबर चर्चा करावी. आणि शरण येण्यासाठी त्याचं मन वळवावं, अशी इच्छा श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी व्यक्त केली होती. मात्र जयललिता यांनी त्याला नकार दिला. दरम्यान, द्रमुकच्या दबावामुळे युपीए सरकारनं संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी यांना श्रीलंकेला पाठवलं आहे. प्रणव मुखर्जी यांनी राजपक्षे यांच्याबरोबर चर्चा केली. राजपक्षे यांनी श्रीलंकेतल्या तामिळींच्या सुरक्षेची हमी दिल्याचं मुखर्जी यांनी सांगितलंय.

close