जादूटोणाविरोधी विधेयकाचा वटहुकूम काढणार

August 21, 2013 4:08 PM3 commentsViews: 1129

jadu tona21 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धेला आळा बसावा आणि राज्यभरात अशा घटनांवर सरकारने अकुंश ठेवावा यासाठी जादूटोणाविरोधी विधेयकाची मागणी केली होती. मात्र राजकीय पक्षाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. मात्र आज त्यांच्या मृत्यूनंतर जादू टोणाविरोधी विधेयकाचा वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी ‘IBN लोकमत’ला दिलीय.

वटहुकुमासाठी आजच राज्यपालांना विनंती करण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी वटहुकुमाची मागणी केली होती. काल त्यांचा पुण्यात खून झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी सरकारनं वटहुकुमाचा निर्णय घेतलाय. मंत्रिमंडळ बैठकीत डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनावरून खडाजंगी झाली. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाली आहे अशी टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणेंना पाठिंबा दिला. त्यामुळे गृहमंत्री आर आर पाटील अडचणीत आले.

गेल्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पारित होऊ शकलं नाही. पण येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक पारित होणार असं सूत्रांकडून कळतंय. पण राज्य सरकारला अधिवेशनाची वाट पाहण्याची गरज नसून राज्य सरकार या वटहुकूम काढू शकते. त्यानंतर राज्य सरकारला हिवाळी अधिवेशनात याला मंजुरी द्यावी लागेल. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी 7 जुलै 1995 रोजी अशासकीय विधेयक मांडण्यात आले.

त्यानंतर दहा वर्षानंतर 15 एप्रिल 2005 रोजी शासकीय विधेयक मांडण्यात आलं मात्र विरोधामुळे स्थगित करण्यात आलं. त्यानंतर 16 डिसेंबर 2005 रोजी विधानसभेत विधेयक मंजूर पण विधान परिषदेत मंजूर झाले नाही. त्यानंतर हे विधेयक चिकित्सा समितीकडे गेले पण निर्णय काही झाला नाही. 2011 मध्ये नव्याने हे विधेयक मांडण्यात आलं पण त्यावर चर्चा झाली विरोध कायम होता. मागिल पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आलं पण यावरही काही निर्णय झाला नाही. या विधेयकाला वारकर्‍यांनी विरोध दर्शवला होता. वारकर्‍यांशी चर्चा करून हे विधेयक नव्या सुधारणा करून मांडलं जाईल अशी माघार घेत सरकारने जाहीर केलं.

 • sandy

  pranachi aahuti dilya shiway Sarkaar jaage hot nahi haa aapla itihas aahe

 • Atul Rege

  Politicians are taking advantage of the situation. Citizens of Pune took the correct step by not allowing politicians to talk in the NISHEDH MORCHA. The anti supestition act should not remain on paper, as usual.
  I salute Dr Narendra Dabholkar

 • akshay mestry

  anis he dabholkarancya khuna mule thambnar nahi. Karyakartyani aankhi jomane chalval chalu thevaychi aahe . shasnane tyanchya mage khambir pane ubhe rahile pahije

close