रॉबर्ट वडरांचा ‘कारभार’, काल्पनिक चेकद्वारे दिले पैसे !

August 21, 2013 5:03 PM0 commentsViews: 1244

robat vader21 ऑगस्ट : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडरांच्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. वडरा यांनी ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडने जमीन खरेदी केल्यानंतर चक्क काल्पनिक चेकद्वारे पैसे चुकते केले होते, असा प्रकार उघड झालाय.

सीएनएन-आयबीएनकडे या प्रकरणाची काही कागदपत्रं हाती लागली आहे. त्यावरून हे उघड झालं. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या आयएसएस अधिकारी अशोक खेमका यांनी हाच आरोप केला होता.

या कागदपत्रांवरून असं दिसतं की, रॉबर्ट वडरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटालिटी या फर्मनं फेब्रुवारी 2008मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून साडेतीन एकर जमीन खरेदी केली तेव्हा त्यांच्या बँकेच्या खात्यात पैसे नव्हते. हे पैसे डीएलएफ या कंपनीनं वडरा यांच्या दुसर्‍याच एका कंपनीमार्फत वडरा यांना दिले होते.

close