आसाराम बापूंविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

August 21, 2013 2:06 PM1 commentViews: 1374

Image img_227212_asarambapu6_240x180.jpg21 ऑगस्ट : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणखी एका वादाच्या भोवर्‍यात सापडलेय. आसाराम बापूंच्या जोधपूरमध्ये असलेल्या गुरुकुलमधल्या एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूंविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे.

मात्र, याबाबतचा एफआयआर दिल्लीमधल्या मार्केट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. सोमवारी आसाराम बापूंनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार या मुलीनं दाखल केली आहे. आता ही तक्रार राजस्थान पोलिसांकडे वर्ग करण्यात येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आसाराम बापूंनी दिल्लीमधल्या सामूहिक बलात्कार पीडित तरुणीविरोधातही वक्तव्य केलं होतं.

बलात्कारासाठी ती मुलगीच जबाबदार असल्याचं विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात समाजात रोष निर्माण झाला होता. आता आसाराम बापूंच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

  • pranay

    dabholkarani kelelya kaydya antargat asha dhongi babanwar pan kadak karwahi karnyat yavi.ani ha kayda lawrat lawkar lagu karawa.ya asha samajkantakankade itka paisa kuthun yeto yachi chaukashi karayla havi.Nirlajja asaram bapu he ya bhartiy sankrutila lagleli kid ahe.
    jay bhim jay bharat

close