दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्च्यात गोंधळ

August 21, 2013 5:22 PM0 commentsViews: 2438

pune morch21 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाचा राज्यभरातून निषेध व्यक्त होतोय. पुण्यात आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आलाय. हत्येचा निषेध करण्यासाठी पुणे महापालिका ते महात्मा फुले मंडईपर्यंत भव्य निषेध मोर्चा निघाला. मात्र या मोर्च्यात गोंधळ उडाला.

मोर्चात सहभागी झालेल्यांनी तिथं भाषणं करणार्‍या राजकीय नेते आणि प्रतिनिधींना अडवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला तुमची भाषणं ऐकायची नाहीत असं सांगत कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांची बोलती बंद केली. यामुळे राजकीय नेत्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

दाभोलकरांच्या खुनाचा निषेध करण्यासाठी महापालिका ते लोकमान्य टिळक पुतळा असा हा भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय. यात विविध सामाजिक संघटना, कॉलेजचे विद्यार्थी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय आणि कम्युनिस्ट पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवाय पुणे शहरात आज बंद पाळण्यात येतोय. भागाभागात आज दुकानं ठेवण्यात आली आहे.

तर दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधार्थ सातार्‍यात शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय. दाभोलकरांशी संबंधित संघटनांनी सातारा शहरात अनेक ठिकाणी कालच निषेध सभा घेतल्या. आज संध्याकाळी पाच वाजता सातार्‍यातील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये डॉ. दाभोळकरांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय. त्यामध्ये सर्व परिवर्तनवादी कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

close