ब्लॉग : अलविदा कॅप्टन !

August 22, 2013 3:07 AM1 commentViews: 1230

sandeep_chavan_Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत

नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या… मंगळवारची सकाळच उजाडली त्या या ब्रेकिंग न्यूजनं… अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी केलेले कार्य अवघ्या देशानं गौरवलं… अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे ते संस्थापक सदस्य… समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी अवघं आयुष्य वेचलं… त्यांचा विचार संपवता येत नाही म्हणून त्यांनाच संपवण्याचा घाट घातला गेला… पण माणूस संपवून त्याचा विचार संपत नाही. विचाराला विचारानंच उत्तर द्यावं लागतं… दाभोलकरांचा हा विचार महाराष्ट्रानं पहिल्यांदा अनुभवला तो खेळाच्या मैदानात. महाराष्ट्रातील आजच्या पिढीला खेळाच्या मैदानातील त्यांचं योगदान फारच कमी लोकांना माहीत असेल.

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू महाराष्ट्राचे व्हाईस कॅप्टन… बांगलादेशविरुद्धच्या कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघातnarendra dabholekar img 3 निवड झालेले मुंबई-पुण्याबाहेरचे पहिले कबड्डीपटू… कबड्डीतील संघटन कौशल्यासाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित… कबड्डीतील बोनस लाईनसाठी आग्रही मांडणी करणारा खंदा प्रशासक. माणूस साप्ताहिकातून आपल्या लेखाद्वारे अनेक खेळाडूंच्या करिअरला नवी दिशा देणारे क्रीडा समीक्षक…

क्रीडा क्षेत्रातील अशी अनेक नानाविविध भूमिका नरेंद्र दाभोलकरांनी भूषविल्या… अभिमानानं मिरवल्या आणि सीमारेषेबाहेर राहून प्रसंगी त्यापासून अलिप्तपणाही दाखवला… खेळाडूपेक्षा खेळ मोठा… खेळातील सचोटी जपण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले… ते सर्वत्र होते आणि कुठेही नव्हते… मनात आणलं असतं तर त्यांनी कबड्डीतील संघटनेचं मानाचं पद सहज भूषविलं असतं. तेवढा त्यांचा वकूब होता, पण जाणीवपूर्वक ते त्यापासून दूर राहिले… नव्यांना संधी हे त्यांचं ध्येय…

 

त्यांच्या या ध्येयवादातून सातारा, सांगलीकडे कबड्डीची एक नवी पिढी घडली… साता-यातील श्री शिवाजी उदय मंडळ संस्था ही त्यांच्या या कार्याची साक्ष देतेय… या संस्थेची भव्य वास्तू उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम सातारकर कधीच विसरू शकणार नाही.

narendra dabholekar img 2कबड्डीतील पहिला अर्जुन पुरस्कार ज्या सदा शेट्ये यांना मिळाला त्यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. सदा शेट्ये म्हणतात… खेळात हारजीत ही असतेच, पण त्यापलीकडेही खेळाकडे सचोटीनं पाहण्यास नरेंद्र दाभोलकर यांनी शिकवले… त्यांच्यासारख्या व्यक्तीनं माणूस साप्ताहिकात माझ्यावर लिहिलेला लेख हा मी माझा बहुमान समजतो… नरेंद्र दाभोलकर म्हणजे कबड्डीतील सचोटी… हे सांगताना पाणावलेले सदा शेट्ये यांचे डोळे नरेंद्र दाभोलकरांचं खेळातील त्यांच्या योगदानाची साक्ष देणारे…

नरेंद्र दाभोलकरांचं सगळ्यात मोठं योगदान जर क्रीडा क्षेत्रात काय असेल तर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. खेळातील अपप्रथा दूर करण्यासाठी ते झटले… अवघा महाराष्ट्र त्यांना यासाठी सदैव ओळखत राहील…

नरेंद्र दाभोलकर मरत नसतात, प्रत्येक विचारागणिक ते जिवंत असतात… आपल्यात… तुमच्यात… आपणा सगळ्यात… आपल्यातील नरेंद्र दाभोलकर आपण मरून देता कामा नये हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 

 

  • Dr. Mahajani

    The killing of Dr.Dabholkar should not be a shock to us. In a country where blind faith and irrational behaviour is a rule and not a chance, what do we expect? Just think of it and you will understand how deep rooted the blind faith in our society. This is not religious faith. All of us Hindus, Christians, Muslims are slaves of blind faith. In the so called global (?) city of Mumbai too most of us are victims of such irrational “Blind faith”. Here are some common examples ( vouch that you dont follow these customs)
    1. Large scale sale of “Mirchi and Limbu” on street corners you all hang on ur new cars. 2. when some visitors come to your home to greet a newborn in ur family, the old lady of the house quickly comes out and performs “drusta” of ur child. ( How insulting to ur dear visitor!). 3. When the purohit tells u a perfect muhurat for marriage or any other event, you blindly agree. 4. Dont we see thousands walk the streets of mumbai in the nights of every Monday ? and also offerings of candles of limbs at the Mount Merry church. ( Is this religion or blind faith?). So called educated people behave in this manner. 5. I had a shock of my life when the city went under a curfew during the near total solar eclipse of 1980. Even today, many of us dont even know the science behind the eclipse. 6. Why blame the poor villagers of backward regions when they flock the local “Babas” or miracle temples, churches or dargas for cure of their ailments ? What different are the so called “high tech” Gurus like Sri Sri Rvishankar, Baba Ramdev and Aasaram Baba and dozens of other self proclaimed “GOD MEN” Gurus doing to our society ? ( They all publish books describing so called stories of miracles experienced (?) by their hardcore followers ( i strongly suspect all are written by their PR men ). Do we ever know how much money is collected by these “GURUs”? All these people are earning huge money and leading a lavish lifestyle at the expense of the poor, sick and people in despair. This is sheer exploitation of people’s despair for personal gains and a luxurious livelihood of a few clever people. We dont need a law to counter “Jadu tona” or “quackery” ( The food and drug Administration has a powerful “magic remedies act”, which they dont ever use effectively.) We need a comprehensive powerful ‘Consumer Protection” law like the one recently enacted in England which covers all above mentioned exploitations of people due to their “Blind faith”. Dont dilute the efforts of the Martyer Dr. Dabholkar.

    However, no law will be able to get rid of our widespread “blind faith”. Effective education and scientific mindset alone will bring in the change in our social behavior. Today, I am 65 years old, but my thoughts became rational when my father who was teacher of Marathi effectively taught me the lesson in our 11th standard book : ” Manushyacha dev aani Vishwacha Dev” written by Vinayak Damodar Savarkar almost 100 years ago! I read and digested it 50 years ago and even today I continue to behave rationally.

close