डॉलरच्या तुलनेत रूपयाने गाठली पासष्टी

August 22, 2013 3:57 PM0 commentsViews: 316

indin rupes22 ऑगस्ट : डॉलरच्या तुलनेत रूपयाची घसरण थांबता थांबेना. आजही रूपयाची ऐतिहासिक घसरणं झाली असून डॉलरच्या तुलनेत रूपयाने पासष्टी गाठली आहे. रूपयाची घसरण रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असले तरी आज गुरूवारी डॉलरच्या तुलनेत रूपयांने प्रति दर 65.56 रूपयांचा नीचांक गाठला.

आज शेअर बाजाराची सुरूवात होताच 100 अंकांनी घसरण झाली. बुधवारीही रूपयाची मोठी घसरण झाली. रूपयाने 64.51 दर गाठला होता. यामुळे सेन्सेक्स बाजारात एकच गोंधळ उडाला. मंगळवारीही रूपयाने 63 ची पातळी गाठल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं हस्तक्षेप करून अन्य बँकांना आपल्याकडील साठवलेल्या डॉलरची विक्री करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

बँकांनी डॉलरची विक्री केल्यानंतर रूपयाची घसरण थांबली होती. मात्र हा प्रयत्न जास्त काळ तग धरू शकला नाही. दुसर्‍या दिवशी रूपयाची पुन्हा घसरण झाली आणि 64ची पातळी गाठली. रिझर्व्ह बँकेकडून रूपयाची घसरण थांबवण्यासाठी प्रयत्न सूरू आहे मात्र रूपयाची घसरण सुरूच आहे.

close