दाभोलकरांच्या खुनाचे राज्यसभेत पडसाद

August 22, 2013 4:34 PM4 commentsViews: 590

raja sbha22 ऑगस्ट : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे आज गुरूवारी राज्यसभेतही या प्रकरणाचे पडसाद उमटले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा राज्यसभेत सर्वपक्षीय खासदारांनी निषेध व्यक्त केला. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सनातन प्रभातसारख्या कट्टर हिंदूत्ववादी संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी केली.

अंधश्रद्धा विरोधात दाभोलकर यांनी 18 वर्ष लढा दिला. त्यांनी जादूटोणाविरोधी विधेयक तयारही केले. मात्र विधेयक मंजूर होण्याअगोदर त्यांची हत्या करण्यात आली. त्यांना अनेकवेळा हिंदूत्त्ववादी संघटनांनी धमकी दिली होती. त्यामुळे अशा हिंदूत्ववादी संघटनांवर बंदी घालावी अशी मागणी दलवाईंनी केली.

दाभोलकर यांच्या हत्येला दोन दिवस उलटले तरी अजूनही मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आलंय यावर राज्यसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. आज काँग्रेससह भाजपच्या खासदारांनी राज्यसभेत खुनाचा निषेध केला. यानंतर राज्यसभेत कोळसा खाण घोटाळा फाईल्स गहाळ प्रकरण, तेलगंणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी गोंधळ घातला त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं.

 • Aanand P

  nakkich Dabolkarachya hattecha nishedh karto. aani ha kayda yaylach hawa.. pan……..

  faqt hindu samajatach andhshradhha aahe ka?

  muslimanmadhhe
  hindu dharma peksha jasti andhshradhha aahe tyabaddal kon ka bolat nhi
  kahich……Faqt hindu dharmacha sanstanbaddalach ka mhanta ki yawar
  bandi aana..

 • Aanand P

  nakkich Dabolkarachya hattecha nishedh karto. aani ha kayda yaylach hawa.. pan……..

  faqt hindu samajatach andhshradhha aahe ka?

  muslimanmadhhe
  hindu dharma peksha jasti andhshradhha aahe tyabaddal kon ka bolat nhi
  kahich……Faqt hindu dharmacha sanstanbaddalach ka mhanta ki yawar
  bandi aana..

 • kapil koruche

  Andhshraddha nirmulanacha kayada pass honyasathi sudhha ek NARBALI gela.
  Pan IBN LOKMAT che abhinandan jyanni ha mudda laun dharla .

 • Sham Dhumal

  तीन दिवस झाले तरी अजुन दाभोळकरांचे खूनी पकडले नाहीत.
  खूनी आणि खूनाचे सूत्रधार यांना पकडुन शिक्षा करणे गरजेचे
  असताना सत्तेतील नेते मात्र कोणावर तरी बंदी घालण्यासाठी फारच
  उतावळे झालेले दसतात.
  आरोपी अजुन मळत नाहीत. गुन्हगारांना कायद्याची भीतीच
  राहिली नाही. गुन्हेगारांच्या तडीपारी मंत्रालयातून रद्द होतात. तडीपारी
  रद्द करुन गुन्हेगारांना मदत करणारे कोण आहेत?
  जादूटोणा बिलाबाबत अपप्रचार चालू असताना पोलीस आणि
  सरकार गप्प का होते? हे गृहखात्याचे/सरकारचे अपयश नाही का?

close