पाककडून सीमारेषेवर पुन्हा गोळीबार

August 22, 2013 4:53 PM0 commentsViews: 624

india vs pak22 ऑगस्ट : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापाती सुरूच आहे. आज दुपारा 12 च्या सुमारास सीमारेषेवर पाक सैनिकांनी जोरदार गोळीबार केल्याचं वृत्त आहे. जम्मु आणि काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये पाक सैनिकांनी गोळीबार केला.

बुधवारी रात्रीही पाक सैनिकांनी दोन वेळा गोळीबार केला. त्याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. यात पाक सैन्याचा एक कॅप्टन मारला गेला तर अन्य जवान जखमी झाले. पाकने केलेल्या गोळीबाराला भारताने चोख प्रतिउत्तर दिले असं सैन्यानं स्पष्ट केलं. पूंछमधील हमीरपूर भागातील भारतीय चौक्यांवर पाक सैनिकांनी 20 ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास आणि 21 ऑगस्टला पहाटे अकारण गोळीबार केला.

आतापर्यंत पाकने 83 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. याच महिन्यात 5 ऑगस्ट रोजी पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबार भारताचे 5 जवान शहीद झाले होते. मात्र पाकने नेहमी प्रमाणे आम्ही काहीच केलं नाही असा आव आणला. मागिल आठवड्यात पाकची घुसखोरी कॅमेर्‍यात कैद करण्यात आली. याच ठोस पुरावे भारतीय सैन्यानं प्रसिद्ध केलाय. पण तरीही पाककडून कुरापाती सुरूच आहे. या गोळीबाराआड दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यास मदत केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

close