मुंबई गँगरेप प्रकरणी एक आरोपी अटकेत

August 23, 2013 1:18 PM0 commentsViews: 2229

nagar rape 23 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर चार आरोपींचा शोध सुरू असून त्यांची ओळख पटली आहे. पीडित तरूणीची प्रकृती स्थिर अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या प्रकरणात एका आरोपींने गुन्हा कबूल केला असून सगळे आरोपी हे 20 ते 22 वयोगटातले आहे. सर्व आरोपी हे महालक्ष्मी भागातच राहणारे असून यातील दोघा जणांनी हे कृत्य केल्याचं सिंग यांनी सांगितलं.

ही घटना गुरूवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. पीडित तरूणी एका मासिकात इंटनशीप करत असून ती छायाचित्रकार आहे. ती आणि तिचा सहकारी मित्र महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये फोटोशूट करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाचही नराधामांनी त्यांना हटकलं. तुम्ही इथं का आला, फोटोशूट का करताय. असं विचारात त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

आरोपींनी तीच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि पीडित तरूणीला मिलमध्ये काही अंतरावर नेऊन दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पीडित तरूणीला 8 वाजता जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दाखल करण्याच्या अर्ध्या तासानंतर 8.30 वाजता पोलिसांनी ही माहिती कळाली. त्यानंतर पोलिसांनी 20 टीम तयार केल्यात आणि तपासासाठी पाठवण्यात आल्यात. त्यानंतर पीडित तरूणीच्या सहकारी मित्राच्या सांगण्यानुसार स्केच तयार करण्यात आले आणि त्या मार्गाने तपास सुरू केला. आज दुपारी एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने गुन्हाही कबूल केला.

अंत्यत धक्कादायक अशी घटना असल्यामुळे या घटनेचे पडसाद उमटू नये यासाठी आरोपींची नावं गुप्त ठेवण्यात आलीय. यातील ज्या दोन तरूणांनी बलात्कार केला त्यांच्यावर या अगोदरही गुन्हे दाखल आहे. पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक केली जाईल असा विश्वासही सिंग यांनी व्यक्त केला.

close