गृहमंत्री राजीनामा द्या,सेना-मनसेची मागणी

August 23, 2013 2:07 PM0 commentsViews: 1175

raj on r r partil23 ऑगस्ट : छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणाचे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राज्यसभेतही याचे पडसाद उमटले. तर शिवसेना आणि मनसेनं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी टार्गेट करत थेट राजीनाम्याची मागणी केलीय.

 

सामूहिक बलात्काराची घडलेली घटना अतिशय धक्कदायक आहे. सरकार करतंय काय?, गृहखाते, पोलीस, गुप्तचर माहिती विभाग काय करतेय? गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय, कायदा सुव्यवस्था कोलमडलीय. महिला, मुली सुरक्षित नाहीत, मुंबईत येणारे लोंढे थांबविले नाहीत तर मुंबईतील असुरक्षितता वाढणार आहे, त्यामुळे गृहमंत्री आर आर पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय.

 

तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आर.आर.पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. या अगोदरही अशा धक्कादायक घटना घडल्यात पण गृहमंत्र्यांनी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. शरद पवारांचे कुरिअर बॉय असल्यासारख ते काम करत आहे त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणी राज यांनी केली.

 

दरम्यान, दिल्लीमधल्या राजकीय वर्तुळातही याचे तीव्र पडसाद उमटले. राज्यसभेत प्रश्नोत्तराचा तास रद्द करून यावर चर्चा करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या स्मृती इराणी यांनी केलीये. मुंबईत येणारे लोंढे थांबवले नाहीत तर असुरक्षितता वाढत राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

 

close