गृहमंत्र्यांना बांगड्या पाठवा -राज ठाकरे

August 23, 2013 3:28 PM0 commentsViews: 2975

raj on r r partil_new23 ऑगस्ट : आर.आर.पाटील हे गृहखातं सांभाळण्यासाठी सक्षम नाही. शरद पवारांना माहिती पुरवणारा हा माणूस आहे. संपूर्ण गृहखातं कुरिअर सर्व्हिस केलंय. कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे त्यामुळे अशा गृहमंत्र्यांच्या सांगली आणि मुंबईच्या घरी बांगड्या पाठवाव्यात कमीत कमी याची लाज वाटून गृहमंत्री राजीनामा देतील जर नाही दिला तर याच्या सारखा निगरगठ्ठ माणूस पाहिला नाही असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना आणि सर्व राजकीय पक्षांना केलं.

मुंबईत गुरूवारी छायाचित्रकार तरूणीवर बलात्कार प्रकरणी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 26/11 च्या बॉम्बस्फोट प्रकरणी आर.आर.पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली होती. 2009मध्ये निवडणुका झाल्या त्यानंतर पुन्हा आर.आर.पाटील यांना गृहमंत्रीपदावर बसवले. आता का बसवले माहित नाही.

मी अगोदरही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यांना महाराष्ट्राच्या गृहखात्याशी काहीही घेणं देणं नाही. त्यांना गृहखात्यातलं काहीही कळत नाही. पण ते असे जाणार नाही. याच कारण शरद पवारांनी बसवलेला हा माणूस आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतंभूत माहिती, त्यांच्या भाषेत ‘माहित्या’ असे असून हे गृहखातं फक्त कुरिअर सर्व्हिस झालंय. फक्त शरद पवारांना दिल्लीत माहिती पुरवणार हा माणूस आहे अशी शेलक्या शब्दात राज ठाकरे यांनी आर.आर.पाटील यांच्यावर टीका केली. खाकी ड्रेस घालून एक माणूस उभा केला तर पोलीस कोण आणि पोस्टमन कोण हेही कळणार नाही अशी टीकाही राज यांनी केली.

तसंच राज्यभरात त्यांच्याविरोधात इतका आवाज उठवला जात आहे तरी हे राजीनामा देत नाही. एवढंच नाही तर पोलिसांच्या बदल्या अडवून ठेवल्या आहे. आपल्या मर्जीतल्या पोलीस अधिकार्‍यांसाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमुळे बदलीच्या फाईली अटकून पडल्या आहेत असा आरोपही राज यांनी केला. कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. त्यामुळे अशा गृहमंत्र्यांच्या सांगली आणि मुंबईच्या निवासस्थानी बांगड्या पाठवाव्यात कमीत कमी याची लाज वाटून गृहमंत्री राजीनामा देतील जर नाही दिला तर याच्या सारखा निगरगठ्ठ माणूस पाहिला नाही असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांना आणि सर्वपक्षीयांना केला. आज व्यक्ती बदलणे गरजेच आहे, जोपर्यंत जनतेचा रेटा यांच्या मागे लागणार नाही हे सुधारणार नाही असंही राज यांनी म्हटलं.

close