गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य -मुख्यमंत्री

August 23, 2013 2:10 PM0 commentsViews: 769

23 ऑगस्ट : सामूहिक बलात्कार प्रकरणी शिवसेना आणि मनसेनं गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आबांच्या पाठीशी उभे राहिले आहे. गृहमंत्र्यांचं काम अवघड असतं. महाराष्ट्र राज्य मोठं आहे, पोलीस खात्याचा कारभारही मोठा आहे त्यामुळे राजीनामा मागणे हे योग्य नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली. तसंच पीडित तरूणीच्या हॉस्पिटलच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय.

close