राज ठाकरेंची टीका चुकीची -रजनीताई पाटील

August 23, 2013 2:27 PM0 commentsViews: 2584

23 ऑगस्ट : राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना बांगड्या पाठवा असं आवाहन केलं हे अत्यंत चुकीचं विधान आहे. राजकीय दृष्टी हे विधान चुकीचे आहे. कारण ज्यावेळेला महिलांना समानतेचा अधिकार आपण मागतोय. 21 व्या शतकात जर महिलांसाठी बांगड्या या कमकवुतेचं लक्षण मानात असाल तर ते चुकीचं आहे. तुमची राजकीय समिकरण काय असतील ती असतील पण एक महिला म्हणून, महाराष्ट्राची कन्या म्हणून अशा प्रकारे बोलून महिलांचा आणखी अपमान करू नका अशी विनंती काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी केली. मुंबईतील सामूहिक बलात्कार प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील सक्षम नसून त्यांना गृहखातं सांभाळता येत नाही. ते फक्त पवारांना माहिती पुरवण्यासाठी गृहमंत्रीपदावर बसले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली असून राज्यातील महिलांनी गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बांगड्या पाठवाव्यात असं आवाहन केलं होतं.

close