बाळाच्या चोरी प्रकरणी नर्स आणि डॉक्टरवर कारवाई

January 29, 2009 5:33 AM0 commentsViews: 5

29 जानेवारी, मुंबईसायन हॉस्पीटल मधून चार दिवसाचं बाळ गायब झाल्याप्रकरणी डॉक्टर आणि नर्सला सस्पेंड करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं आज दिले. जानेवारी 2009 रोजी मोहन नेरुरकर यांचं चार दिवसाचं बाळ गायब झालं होतं. त्याचा शोध पोलीस अजून लावू शकलेले नाहीत. त्याविरोधात मोहन नेरुरकर यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. आज त्याची सुनावणी झाली. या प्रकरणी ड्युटी इंचार्ज डॉक्टर आणि नर्सला सस्पेंड करण्याचा आदेश हायकोर्टानं काढलाय. तर बाळाचा शोध न लावल्याबाबत स्वत: मुंबईच्या पोलीस कमिशनरांना कोर्टात हजर होण्याचा आदेश देण्यात आला आहे.

close