वाळू माफियांकडून सरपंचाची विष देऊन हत्या

August 23, 2013 9:15 PM0 commentsViews: 131

bhandar story23 ऑगस्ट : भंडारा जिल्हयात वाळूमाफियांनी एका सरपंचाची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मोहाडी तालुक्यातल्या मोहगाव देवी गावात ही घटना घडलीय. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय.

गेल्या काही दिवसांपासून पुंडलिक डेंगे या सरपंचानं वाळूमाफियांविरोधात मोहीम उघडली होती. या गावातून होणार्‍या ट्रक वाहतुकीमुळे गावातले रस्ते खराब होत आहे. याचा गावकरी अनेक दिवसांपासून विरोध करत होते. यासंदर्भात या सरपंचाला वाळूमाफियांनी पैशाचं आमिष दाखवलं होतं.

पण सरपंचाने त्याला विरोध केला. गावातील काही लोकांना घेऊन वाळू ठेकेदारानं सरपंचाला जेवण्याचं निमंत्रण दिलं. यात दारू आणि जेवणातून त्याला विष देण्यात आलंय. प्रकृती खालावल्यानं त्यांना नागपूरमधल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. पण ते कोमात गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणानं संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी तीव्र आंदोलनं केलं.

close