कल्याण – कर्जत रेल्वेसेवा पूर्ववत

January 29, 2009 6:40 AM0 commentsViews: 2

29 जानेवारी, मुंबईकर्जत- कल्याण दरम्यान विस्कळीत झालेली लोकलसेवा पुन्हा सुरू झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्यामुळं रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सोमोरं जावं लागलं.सकाळी 9 वाजता ही ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान प्रवासी ताटकाळले होते. रेल्वे प्रशासनानं प्रवाशांना कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रवाशामध्य गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रवाशांमध्ये काही कॉलेजचे विद्यार्थी होते, ज्यांच्या आज परीक्षा होत्या. रेल्वे प्रसासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना परीक्षा देता आली नाही. आता या विद्यार्थ्यांचं नुकसान कसं भरून निघणार ? या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

close