शिवीगाळ करणार्‍या कदमांनी दिला उद्धव ठाकरेंकडे राजीनामा

August 24, 2013 5:26 PM1 commentViews: 2769

anil kadam24 ऑगस्ट : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव टोल नाक्यावर महिला कर्मचार्‍यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करणारे शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी आपला राजीनामा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलाय. पण त्या महिलांच्या विरोधात आपली तक्रार कायम आहे असं ही कदमांनी राजीनामा देताना सांगितलं.

चोहूबाजुंनी टीका झाल्यानं कदम यांनी आज नैतिक जबाबदारी स्विकारत दोन दिवसांनंकर आपला राजीनामा दिलाय. गुरूवारी पिंपळगाव टोल नाक्यावर ओळखपत्र मागितल्याचा राग आल्यानं शिवसेनेचे आमदारांनी महिला कर्मचार्‍यांशी असभ्य भाषा वापरली होती.

विशेष म्हणजे आमदारकीचा राजीनामा विधासभेच्या अध्यक्षांकडे सोपवण्यात येतं असतो पण अनिल कदम यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सोपवलाय. जर पक्षाध्यक्षांनी राजीनामा स्विकारला तर तो पुढे विधानसभेच्या अध्यक्षांकडे पाठवला जाईल पण पक्षाध्यक्षांनी स्विकारला नाहीच तर हे एक राजीनामा नाट्यचं ठरेल.

काही दिवसांपूर्वी मुंबईत खड्‌ड्यांमुळे व्यथित होऊन स्थायी समितीचे अध्यक्ष राहुळ शेवाळे यांनी राजीनामा दिला होता पण उद्धव ठाकरेंनी राजीनामा फेटाळून लावला होता. पण या प्रकरणात कदमांच्या असभ्य वागण्यामुळे चौफेर टीका झाली. आज उद्धव ठाकरे नाशिक च्या दौर्‍यावर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांच लक्ष लागलंय.

  • mahendra mone

    lath marun haklun dya tya kadmala

close