आव्हाडांनी आम्हाला शिकवू नये -मेटे

August 24, 2013 6:01 PM1 commentViews: 1919

vinayk mete on awadh24 ऑगस्ट : मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगणारे कोण लागून गेले अशी टीका करत शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. आव्हाड हे नवीन अध्यक्ष झाले असून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत ते फक्त शरद पवार यांच्यामुळे राष्ट्रवादीत मोठ्या पदावर आहेत. आव्हाडांना मराठा आरक्षणासंदर्भात बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असंही मेटे म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच आम्हाला सांगतील तेच आम्ही मान्य करू असेही मेटे यावेळी म्हणाले. नागपूर इथं शिवसंग्रामकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण शेतकरी जागर परिषदेत मेटे बोलत होते.

तर मेटे हे आकाशातून आलेले नेते आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलावं हे त्यांना कळतं. राष्ट्रवादीत अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता घडला आहे. मी सुद्धा त्यातला एक आहे. त्यामुळे आपला नेता काय सांगतो हे लक्षात घेऊन आपणं चाललं पाहिजे हे मेटेंना कळत नाही असं प्रतिउत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं. तसंच इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय तेच मीही कार्याध्यक्ष म्हणून सांगितलं असं आव्हाड यांनी सांगितलं.

  • uraj telang

    tu marlya sarkha kar, mi radlya sarkha karto

close