भूपती-नॉवेल्स ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये

January 29, 2009 7:11 AM0 commentsViews: 1

29 जानेवारी, सिडनीभारताच्या महेश भूपतीने डबल्सच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. आज सकाळी झालेल्या सेमी फायनल मॅचमध्ये मार्क नोवेल्सच्या साथीने त्याने ल्युकाज क्युबो आणि ऑलिव्हर मराक या जोडीचा 6-3, 6-1 असा पराभव केला. क्वार्टर फायनलचा अपवाद वगळता भूपती आणि नोवेल्स यांनी आपल्या सगळ्या मॅच सरळ सेटमध्ये जिंकल्या आहेत. एकूण तीन ए टी पी टायटल्स त्यांच्या खात्यात जमा आहेत. ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचण्याची मात्र त्यांची ही पहिलीच वेळ आहे. नोवेल्सने यापूर्वी 2002मध्ये डॅनिअल नेस्टरच्या साथीने ही स्पर्धा जिंकली आहे. पण भूपतीला मात्र पुरुषांची डबल्स अद्याप जिंकता आलेली नाही.

close