मराठमोळी लंगडीही आंतरराष्ट्रीय पातळीवर

August 24, 2013 11:01 PM0 commentsViews: 191

रोहन कदम,मुंबई

24 ऑगस्ट : लहानपणी विरंगुळा म्हणून आपल्यापैकी प्रत्येकानेच लंगडी खेळलीय..पण आता याच लंगडीनं मुंबई किंवा महाराष्ट्राचीच नाही तर भारताची सीमा ओलांडत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक स्वरूप मिळवलंय. नेपाळमध्ये होणार्‍या मैत्रिपूर्ण लंगडी मॅचसाठी भारतीय टीम सज्ज झालीय.

शिवाजीपार्कच्या मैदनावरचा हा सराव तसं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतोय.खेळाडू सराव करतायत तो आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी… महाराष्ट्राच्या मातीत बहरलेला हा खेळ आता देशाची सीमा ओलांडतोय.नेपाळमध्ये होणार्‍या लंगडी स्पर्धेसाठी 26 ऑगस्टला भारतीय टीम रवाना होणार आहे. लंगडी स्पर्धेची क्रेझ दिवसागणिक वाढतेय. आणि म्हणूनचं भारत विरुद्ध नेपाळचा मुकाबला पाहण्यासाठी भुतानचे खेळाडूही तेथे येणार आहेत. लंगडीतील कौशल्य त्यांना दाखवण्यासाठी खेळाडूही सज्ज झालेत. खेळाच्या विकासाला खो बसू नये म्हणून संघटना सर्वोतपरी प्रयत्न करतेय.

कबड्डी … खोखो पाठोपाठ आता मराठमोळा लंगडी खेळही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झालाय. लंगडीची सुरूवात तर दमदार झालीय. गरज आहे ती त्यात सातत्य ठेवण्याची.

close