बीडमध्ये झालेल्या स्फोटातील पीडितांना मदत जाहीर

January 29, 2009 7:14 AM0 commentsViews: 1

29 जानेवारी, बीडबीड जिल्ह्यात नेकणूर गावाजवळ फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 8 जण ठार तर 7 जण जखमी झाले होते. राज्य सरकारनं या दुर्घटनेतल्या मृतांना एक लाख रुपयांची मदत देली आहे तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत दिली आहे. शेख सलीम शहानूर यांच्या चंदन फायर वर्क्स या कारखान्यात हा स्फोट झाला होता. या कारखान्यात शोभेच्या दारूची निर्मिती होत होती. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की कारखान्याच्या शेड्सचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मृतांमध्ये 13 ते 20 वयोगटातील मुलींचा समावेश आहे.

close