अखेर अन्नसुरक्षा विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू

August 26, 2013 3:22 PM0 commentsViews: 213

Image img_236962_loksabha44_240x180.jpg26 ऑगस्ट : प्रचंड विरोधानंतर अखेर महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा विधेयकावर संसदेत चर्चा सुरू झालीय. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के व्ही थॉमस यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं. सध्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्न सुरक्षेची तरतूद करण्यात येईल, असं थॉमस यांनी सांगितलं. लाभार्थी निश्चित करण्याची अंतिम जबाबदारी राज्य सरकारांची असल्याचं ते म्हणाले. हे विधेयक सभागृहानं मंजूर करू नये, असा ठराव सीपीआयचे खासदार प्रबोध पांडा यांनी मांडला.

विधेयक अपूर्ण आहे आणि त्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश नसल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, विधेयक लोकसभेत आजच मंजूर होईल, अशी आशा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना वाटतेय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने अन्नसुऱक्षा विधेयक लागू केलं. पण पावसाळी अधिवेशनापूर्वीच भाजपने अन्न सुरक्षावर चर्चा होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली होती.

काँग्रेसकडून निवडणुकीसाठी खेळी आहे असा आरोप करत भाजपने कडाडून विरोध केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली मात्र विरोधकांनी अन्न सुरक्षा विधेयकावरून प्रचंड गदारोळ केला त्यामुळे अधिवेशनाचे दोन आठवडे पाण्यात गेले. मात्र मोठ्या विरोधानंतर आज संसदेत अन्न सुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू झालीय.

close