84 कोस यात्रा राष्ट्रविरोधी -मुलायम सिंह यादव

August 26, 2013 3:40 PM0 commentsViews: 322

Image img_195672_mulyamsing_240x180.jpg26 ऑगस्ट : अयोध्येचा वाद जुना असून हा खटला कोर्टात प्रलंबित आहे. या अगोदर भाजपने या प्रकरणावरून विनाकारण वाद घातला आणि देश भरात दंगली झाल्यात. आताही विहिप तेच करत आहे. ही लोकं घटनेला मानत नाही, न्यायपालिकेला मानत नाही, ही यात्रा घटनाविरोधी आणि राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांना केला.

 

तर ही यात्रा शुद्ध धार्मिक यात्रा होती. 13 सप्टेंबरपर्यंत एकूण 20 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे पण उत्तर प्रदेशच्या सरकारनं हिंदूंच्या भावना दुखावल्यात दोन हजारांपेक्षा जास्त साधूंना अटक करण्यात आली त्यांनी वाईट वागणूक दिली असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला.

 

विश्व हिंदू परिषदेच्या अयोध्येहून सुरू होणार्‍या 84 कोस यात्रेवरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ झाला. शून्य प्रहरात भाजपच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. राम मंदिराच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेनं रविवारी अयोध्येत 84 कोस यात्रेचं आयोजन केलं होतं. त्याला राज्य सरकारनं परवानगी नाकारलीये. त्यावरून आज लोकसभेत गदारोळ झाला. या मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

close