आमदार अनिल कदमांना जामीन मंजूर

August 26, 2013 1:50 PM0 commentsViews: 358

anil kadam26 ऑगस्ट : महिला कर्मचार्‍यांना शिवीगाळ करणारे शिवसेनेचा आमदार अनिल कदम यांनी कोर्टाने जामीन मंजूर केला. आज कदम पिंपळगाव कोर्टात हजर झाले आहेत. महिला कर्मचार्‍याचा विनयभंग तसंच आपल्या पदाचा दुरुपयोग करुन दहशत पसरवणे असे गुन्हे त्यांच्यावर लावण्यात आले.

 

दरम्यान, निफाडमध्ये शिवसेनेचे अनिल कदम यांच्या समर्थनासाठी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. पिंपळगाव टोलनाक्यावर कदम यांना टोलचे पैसे मागितल्यामुळे राग येऊन त्यांनी तिथल्या महिला कर्मचार्‍यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी कदम यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

 

close