शिवसेना आणि मनसेकडून दंड वसूल करणार : जयंत पाटील

January 29, 2009 7:35 AM0 commentsViews: 1

29 जानेवारी, मुंबईशिवसेनेनं इन्टर कॉन्टिनेन्टलची केलेली तोडफोड आणि मनविसेनं विद्यापीठाची केलेली तोडफोड त्यांना महागात पडणार आहे. त्यांच्याकडून या प्रत्येक नुकसानीची भरपाई केली जाणार असल्याचं गृहमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलंय.मुंबईतल्या इन्टर कॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये शिवसेनेनं कामगार कपातीच्या मुद्द्यावरून जी तोडफोड केली होती, त्यात हॉटेलचं 18 लाखांचं नुकसान झालंय. तर विद्यापीठात मनविसेनं केलेल्या राड्यामुळे रजिस्ट्रार ऑफिसची नासधूस झालंय. या सगळ्याची किंमत या दोन्ही पक्षांकडून वसूल करण्यात येणार आहे.

close