दाभोलकरांच्या खुनाचा निषेध

August 26, 2013 5:41 PM0 commentsViews: 108

26 ऑगस्ट : डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा निषेध आणि आरोपींना पकडण्याची मागणी करत वेगवेगळ्या परिवर्तनवादी संघटनांनी आज पुण्यात मूक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात तरूण मोठया संख्येनं सहभागी झाले होते. मारेकर्‍यांना तातडीनं अटक करा, अशी मागणी करत त्यांनी पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी दाभोलकर यांच्या खूनप्रकरणाचा आढावा घेतला. त्यांनी पुण्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा केली. तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दाभोलकर यांच्या खुनाला आज 6 दिवस उलटून गेलेत. पण अजून एकही आरोपी अजून पकडलेला नाही.

close