कुणीही उपाशी राहणार नाही-सोनिया गांधी

August 26, 2013 7:01 PM0 commentsViews: 376

soniya gandhi4426 ऑगस्ट : अन्न सुरक्षा विधेयकाचा सर्वांना फायदा होईल विशेष करून दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना मोठा लाभ होईल यासाठी हा ऐतिहासिक निर्णय ठरेल. या निर्णयामुळे जगाला संदेश दिला जाईल की, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी स्विकारतो असं मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी व्यक्त केलं. आज संसदेत महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू आहे. यूपीए सरकारकडून खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कमान सांभाळली. त्यांनी निवदेन सादर करून विधेयक मंजूर व्हावे असं आवाहन केलं.

सोनिया गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीत केली तर शेवट इंग्रजीत केला. 2009 च्या घोषणापत्रात आश्वासन दिल्यानुसार अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करून आम्ही आमचं वचन पाळत आहोत याचा मला आनंद होतो आहे, मागिल काही वर्षांत जनतेला समृद्धमय आयुष्य लाभले पण याची दुसरी बाजू अशी की, कुपोषण, भुकबळी सारख्या समस्या आपल्या समोर एक नवे आव्हान म्हणून उभ्या आहेत. त्यामुळे हे विधेयक मंजूर करून संपूर्ण जगाला संदेश दिला जाईल की, भारत सरकार आपल्या नागरिकांच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी स्विकारतो असं सोनिया गांधींनी म्हटलं.

तसंच त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. विरोधक म्हणतात या विधेयकासाठी धान्य व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आहेत का? तर मला त्यांना सांगायचे आहे की, आपल्याला जनतेसाठी ही साधन संपत्ती उभारायचीच आहे. आणि हे करायचच आहे असंही सोनियांनी ठणकावून सांगितलं. तसंच देशभरात पाच लाखांपेक्षा जास्त स्वस्त धान्य दुकानं आहेत.यातील बहुतांश दुकानं लोकांपर्यंत पोहचली आहे तर काही ठिकाणी पोहचू शकली नाही.

यामुळे स्वस्त धान्य योजनेत सुधारणा करावी लागणार आहे याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. हे विधेयक महिला बचत गटांना स्वस्त धान्य दुकान चालवण्याची संधी देणार आहे. त्यामुळे महिलांना स्वबळावर उभं राहण्याची ही सूवर्णसंधी आहे. तसंच पुढे चालून आधार कार्ड योजनेमुळे बनावट रेशन कार्डला आळाही बसेल असंही सोनियांनी म्हटलंय. या विधेयकासाठी प्रशासन,राज्य सरकारांनी आपली जबाबदारी स्विकारून सर्वांना हे काम करायचं आहे आणि विधेयक मंजूर व्हावं असं आवाहनही सोनियांनी केलं.

close