‘लेडी सिंघम’चा रोडरोमियोंना ‘कोल्हापुरी हिसका’

August 26, 2013 7:34 PM5 commentsViews: 11840

26 ऑगस्ट : रस्त्यांवरून येणार्‍या जाणार्‍या तरूणींची छेड काढणार्‍या रोडरोमियोंना धडा शिकवण्यासाठी कोल्हापुरात ‘लेडी सिंघम’ अवतरलीय. या रोडरोमियोंना कोल्हापुरी हिसका दाखवण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी वेगळी शक्कल लढवलीय. शहरातल्या महाविद्यालयांच्या परिसरात त्या स्वत: सिव्हील ड्रेसमध्ये जाऊन रोडरोमियांचा समाचार घेतायत. ज्योतिप्रिया सिंग या स्वतः कॉलेजच्या परिसरात जाऊन तरुणांवर लक्ष ठेवतात. त्यातली बिनकामाची मुलं आणि मुलींची छेड काढणारे तरूण हेरून त्यांना चांगलाच पोलिसी खाक्या दाखवतात. स्वत: दुचाकीवरुन डीवायएसपी वैशाली माने यांच्या मदतीनं ज्योतिप्रिया महाविद्यालयांच्या कँटीनपर्यंतही जात आहे. त्यामुळे शहरातले अनेक रोडरोमियो भूमिगत झालेत. त्यामुळे शहारतल्या अनेक नामांकित कॉलेजसमोर वावरणार्‍या गुंड आणि सडकसख्याहरिंचे धाबे दणाणले आहेत.

 • mandar

  khup jabrdast karvai kartayat madam asach jar dhak rahila ter faltu lokana baltkar kiva chad chad kartana 10 vela vichar karav lage good work

 • namrata

  good work ascha pahije ya naradhmana kathor shikasha vayala pahije tyana

 • sachin Doke

  after realising Dabbang n singham ….evry PSI thinks that evry person is culprit….same things happned in kalyan also…ITs good that police craeting fear in the mind of public n road romeos whatever it….but some people are innocent…..n sometimes constable demand bribe from couples….what about that things….? will they address that issue …?

 • Rupesh Pawar

  Good Work

 • Surya Theboss

  yana addal hi ghadlich pahije nahi tar yanhe hat jast sutlet.aaibapane varyavar sodlay tyana mhanun he gunhe ghadtat.yavar jarab basvayla havich.

close