राजस्थान पोलिसांनी आसाराम बापूंला बजावले समन्स

August 26, 2013 8:14 PM0 commentsViews: 450

asram bapu26 ऑगस्ट : लैंगिक अत्याचार प्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंला जोधपूर पोलिसांनी समन्स बजावलंय. आसाराम बापूनी जोधपूर इथल्या आश्रमात आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार एका तरूणीनं केली होती. आणि त्या संदर्भात चौकशीसाठीच पोलिसांनी आसाराम बापूंला नोटीस बजावलीय.

त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप ठेवण्यात आलेत. पण, बलात्काराचा आरोप मात्र वगळण्यात आलाय. या प्रकरणी एफआयआर दिल्लीमधल्या मार्केट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. आता ही तक्रार राजस्थान पोलिसांकडं वर्ग करण्यात आलाय.

दरम्यान, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी आज संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. संसदेत याबाबत कुणीच का बोलत नाहीय, असा सवाल त्यांनी विचारला.

आसाराम बापू आणि वाद

– डिसेंबर 2009: पूर्वी आसाराम बापूंच्या भक्ताच्या हत्येबद्दल आसाराम बापू, इतर दोघांविरुद्ध अहमदाबादमध्ये तक्रार दाखल
– मार्च 2010: अहमदाबादमध्ये गुजरात सरकारनं आसाराम बापूंच्या 6700 चौरस किलोमीटर जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत जमीन परत ताब्यात घेतली
– सप्टेंबर 2012: आसाराम बापूंच्या आश्रमात दोन मुलांच्या गूढपणे झालेल्या मृत्यू प्रकरणी गुजरात सीआयडीनं आश्रमाच्या सात अधिकार्‍यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं
– डिसेंबर 2012: दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीलाच आसाराम बापूंनी ठरवलं दोषी
– जानेवारी 2013: मध्य प्रदेशमधली 700 कोटींची जमीन हडप करण्याबाबत चौकशी सुरू करण्यासंदर्भात सरकारची शिफारस
– फेब्रुवारी 2013: जबलपूरमधल्या आश्रमात 24 वर्षीय तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू

close