सोनिया गांधींची तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

August 26, 2013 10:47 PM0 commentsViews: 888

soniya gandhi__326 ऑगस्ट : अन्न सुरक्षा विधेयकावर चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. सोनियांना सर्दी आणि तापाचा त्रास होत असल्यामुळे त्या संसदेतून बाहेर पडल्यात.

 

चर्चे दरम्यान सोनियांनी सर्दी आणि तापाचा त्रास होत असल्याचं त्यांनी राहुल गांधींना सांगितलं. त्यानंतर सोनिया गांधी संसदेतून बाहेर पडल्यात यावेळी त्यांच्यासोबत कुमारी शैलजा सोबत होत्या.

 

काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनियांची रविवारी रात्रीपासून तब्येत ठीक नव्हती. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण आज अन्न सुरक्षा विधेयकासाठी संसदेत उपस्थित राहणे गरजेचं होतं. आज त्यांनी लोकसभेत हजर राहुन विधेयकाच्या बाजून जोरदार बाजू मांडली.

close