ओडिशात नक्षलवाद्यांचा BSF च्या ताफ्यावर हल्ला, 4 जवान शहीद

August 27, 2013 3:09 PM0 commentsViews: 285

naxal attack3327 ऑगस्ट : ओडिशामध्ये नक्षलवाद्यांनी बीएसएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 4 जवान शहीद झालेत. तर 3 जवान गंभीर जखमी झालेत. ओडिशात कोरापूट जिल्ह्यात ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी काही जणांना ओलीस ठेवल्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

आज सकाळी 18 बीएसएफ जवानांचा ताफा विशाखापट्टणम येथून आपल्या कॅम्पवर परत जात असताना नक्षलवाद्यांनी रस्त्यात स्फोटकं पेरली होती. आयईडीच्या वापर करून नक्षवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात ताफ्यातील पहिले वाहन लक्ष झाले.

यात तीन जवान शहीद झाले. यानंतर नक्षलवाद्यांनी ताफ्यावर बेछुट गोळीबार केला. जवळपास एक तास नक्षलवादी आणि जवानांमध्ये गोळीबार सुरू होता. या घटनेची माहिती कळताच बीएसएफ जवानांचा अतिरिक्त ताफा तात्काळ घटनास्थळी रवाना झालाय.

close