नाशिकमध्ये पतंग उडवताना शॉक लागून मृत्यू

January 29, 2009 8:40 AM0 commentsViews: 6

29 जानेवारी, नाशिकदीप्ती राऊत पतंग उडवताना इलेक्ट्रिक वायर्सचा शॉक लागलेल्या मुलाचा नाशिकमध्ये मृत्यू झालाय. त्या मुलाचं नाव आहे मृगनेश. मृगनेश इयत्ता सहावीत शिकत होता. मृगनेशच्या दुदैर्वी मृत्यूनं सिडकोतल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. विद्युत वितरण कंपनीनं मृगनेशच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत घोषीत केलीये. त्यापैकी 20 हजार रुपये त्यांनी दिलीये. 16 जानेवारीला मृगनेशला इलेक्ट्रीक वायर तुटल्यामुळे पतंग उडवताना धक्का बसला. मृगनेशप्रमाणं पतंग उडवताना इतरही मुलांना धक्का बसला. पण मृगनेशला बसलेला धक्का हा जास्त पॉवरचा असल्यामुळं त्याला तत्काळ आयसीयुत हलवण्यात आलं. सिडकोतल्या तुटलेल्या विद्युत वाहकांना तारा दुरूस्त करण्याबाबत एम.एस.ई.बीच्या कार्यालयात वारंवार तक्रारी दिल्या गेल्या. पण त्या वायर्स दुरूस्त करण्यासाठी मात्र कोणीही आलं एमएसईबीतून दाद दिली गेली नाही. शेवटी आज मृगनेशचा दुदैर्वी मृत्यू झाला. मृगनेशच्या या दुदैर्वी मृत्यूनं सिडकोतल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. त्यामुळे सिडकोच्या नागरिकांनी एम.एस.ई.बीच्या बाहेर आंदोलन करायचं ठरवलंय. पण विद्युत वितरण कंपनीनं मृगनेशच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत घोषीत केलीये. तेही वायर किती उंचीवर आहे त्याची पाहणी करून. त्यापैकी 20 हजार रुपये त्यांनी दिलीयेत. उरलेली 1 लाख 80 हजार रुपयाची रक्क्कम लवकरच देणार आहेत.

close