बापूंभोवती फास आवळला, देश सोडून जाण्यास मनाई

August 27, 2013 6:37 PM1 commentViews: 1066

Image img_227212_asarambapu6_240x180.jpg27 ऑगस्ट : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूंविरोधात समन्स बजावण्यात आलेत. पण, बापू चौकशीसाठी पोलिसांसमोर यायला टाळटाळ करत आहेत. त्यामुळे जोधपूर पोलिसांनी आता बापूविरोधात लूकआऊट नोटीस बजावलीय.

या लूकआऊट नोटीसमुळे त्यांना देश सोडून जाता येणार नाही. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयानं राजस्थान, मध्यप्रदेश आणि दिल्ली सरकारला या प्रकरणाच्या तपासाची वेळोवेळी माहिती द्यावी, असे सख्त आदेश दिले आहे.

दरम्यान, बापूविरोधात बजावलेल्या समन्सचा विरोध करण्यासाठी मध्य प्रदेशच्या उद्योग मंत्र्यांनी बापूच्या इंदूरमधल्या आश्रमाबाहेर आंदोलन केलं. आसाराम बापूंनी जोधपूर येथील आश्रमात आपला लैंगिक छळ केल्याची तक्रार एका तरूणींने केलीय. या तक्रारीमुळे बापूंविरोधात लैगिंक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आसाराम बापू आणि वाद

– डिसेंबर 2009: पूर्वी आसाराम बापूंच्या भक्ताच्या हत्येबद्दल आसाराम बापू, इतर दोघांविरुद्ध अहमदाबादमध्ये तक्रार दाखल
– मार्च 2010: अहमदाबादमध्ये गुजरात सरकारनं आसाराम बापूंच्या 6700 चौरस किलोमीटर जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत जमीन परत ताब्यात घेतली
– सप्टेंबर 2012: आसाराम बापूंच्या आश्रमात दोन मुलांच्या गूढपणे झालेल्या मृत्यू प्रकरणी गुजरात सीआयडीनं आश्रमाच्या सात अधिकार्‍यांविरोधात आरोपपत्र दाखल केलं
– डिसेंबर 2012: दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीलाच आसाराम बापूंनी ठरवलं दोषी
– जानेवारी 2013: मध्य प्रदेशमधली 700 कोटींची जमीन हडप करण्याबाबत चौकशी सुरू करण्यासंदर्भात सरकारची शिफारस
– फेब्रुवारी 2013: जबलपूरमधल्या आश्रमात 24 वर्षीय तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू

  • Kalpana Charudatta

    आता तरी भोंदूबाबा आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या आणि अशा बाबांच्या विरोधात लढा. आज ती एक कोणीतरी मुलगी असेल पण उद्या ती कोणी माझी बहिण-मुलगी-नात असू शकेल. सावधान!

close