अधिवेशनानंतर डिझेल महागणार?

August 27, 2013 6:23 PM0 commentsViews: 218

Image disel_300x255.jpg27 ऑगस्ट : अर्थव्यवस्थेला लागलेली घरघर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती याचा बोजा आता सर्वसामान्य माणसावर पडणार आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी वाढ झालीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल झालीय. त्यामुळे डिझेलच्या किंमती 5 रुपये प्रति लीटरनं वाढण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेचं पावसाळी अधिवेशन संपताच पेट्रोलियम मंत्रालय यासंबंधीचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात सादर करणार आहे. या प्रस्तावाला अर्थमंत्रालयची सुद्धा संमती असल्याचं कळतंय. दरम्यान, रेल्वेही ऑक्टोबरपासून आपल्या मालवाहतुकीचे दर वाढवण्याची शक्यताय. पण, प्रवासी दरात कुठलीही वाढ होणार नाही.

close