ओबामांकडून आणखी एक बेलआऊट पॅकेज

January 29, 2009 9:44 AM0 commentsViews:

29 जानेवारी, अमेरिकाअमेरिकेमध्ये नव्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या 819 अब्ज डॉलर्सच्या मदत पॅकेजला मंजुरी दिली आहे. आता हे पॅकेज मंजुरीसाठी सिनेटकडे जाईल. या पॅकेजद्वारे अमेरिकन अर्थव्यवस्थेला सहारा देण्याचा ओबामांचा हेतू आहे. यात टॅक्सेस कमी करण्यात येणार असून तब्बल 500 अब्ज डॉलर्सनी सरकारी खर्च वाढवण्यात येईल. ओबामांचं हे पॅकेज 188 विरुद्ध 244 मतांनी मंजूर झालं. दुसरीकडे अमेरिकन फेडरल रिझर्व्हनेही आपल्या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत.

close