रूपयाचा ‘मिक्ता’ला फटका, स्विझर्लंडवारी रद्द

August 27, 2013 7:31 PM0 commentsViews: 630

mifta award27 ऑगस्ट : डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रूपयाचा फटका मिक्ता ऍवॉर्डलाही बसला आहे. स्विझर्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेला मिक्ता सोहळा रद्द करण्यात आला असून आता हा सोहळा मकाऊमध्ये होणार आहे.

स्विझर्लंडमध्ये आयोजित केलेल्या सोहळ्याचं बजेट 30 टक्क्याने वाढलं. त्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुण्यामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही माहिती दिली.

यावेळी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ,अभिनेते सचिन खेडेकर उपस्थित होते. येत्या 27, 28 आणि 29 सप्टेंबरला मकाऊमध्ये हा सोहळा रंगणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मागिल वर्षी मिक्ता ऍवॉर्ड सोहळा सिंगापूरमध्ये पार पडला होता.

close