‘जादूटोणाविरोधी विधेयकासाठी उद्धव ठाकरेंचा पुढाकार’

August 27, 2013 6:17 PM0 commentsViews: 693

sham manav27 ऑगस्ट : जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतलाय आणि सर्व हिंदुत्त्ववादी संघटनांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय असं अ.भा. अंनिसचे संस्थापक श्याम मानव यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलंय.

शाम मानव यांची आज उद्धव ठाकरे यांच्याशी या कायद्याबाबत चर्चा झाली. त्यावेळेस उध्दव  यांनी सकारात्मक भूमिका घेतली , असंही शाम मानव म्हणालेत. आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत या विषयावर दोन तास सविस्तर चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, सुभाष देसाईही उपस्थित होते.

शिवसेनेनं पहिल्यापासून विधेयकाच्या बाजूने आपली भूमिका मांडलीय. विधेयकाच्या सुरूवातील सुद्धा सुभाष देसाई यांनी अनेक सुधारणा सांगितल्या होत्या. दाभोलकर यांच्या खुनानंतर दुसर्‍या दिवशी राज्य सरकारने वटहुकूमाचा निर्णय घेतला. त्यानंतर यावर चर्चा करण्यासाठी उद्धव यांनी स्वत: चर्चेसाठी पुढाकार घेतला असंही मानव यांनी सांगितलं.

close