मुंबई गँगरेप : एका आरोपीच्या वयाची खातरजमा होणार

August 27, 2013 10:35 PM0 commentsViews: 588

mumbai gang rape_new27 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी वयाबाबत साशंकता असणार्‍या चांद शेख या आरोपीच्या हाडांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात येणार आहे. त्याच्या वयाची खातरजमा करण्यासाठी ही चाचणी होणार आहे.

दरम्यान, एका महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती लागलाय. पीडित मुलगी आणि तिच्या मित्राला अडवून जेव्हा एका आरोपीनं त्याच्या इतर तीन साथीदारांना फोन केला, तेव्हा हा साक्षीदार त्या साथीदारांबरोबर होता. सर्व पाच आरोपींचे डीएनए (DNA) नमूने घेण्यात आलेत.

गुजरातचे फॉरेंसिक तज्ज्ञ एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. लेयर्ड व्हॉईस ऍनॅलिसिस असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे. या सगळ्यामुळे पाचही आरोपींविरोधात कोर्टात भक्कम आरोपपत्र दाखल करायला मदत होणार आहे. रविवारी पाचव्या आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली या सगळ्या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय.

सोमवारी मुंबई पोलीस आयुक्त यशपाल सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोपी अल्पवयीन नाही असं स्पष्ट केलं होतं. तसंच तो जर अल्पवयीन असेलच तर त्याबाबत चाचणी घेतली जाईल असं स्पष्ट केलं होतं. त्यानुसारच आरोपी चांद शेखच्या हाडांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात येणार आहे.

close