महागई दरात वाढ

January 29, 2009 9:52 AM0 commentsViews: 5

29 जानेवारीसतरा जानेवारीला संपलेल्या आठवड्यात महागाई दरात थोडी वाढ झालीय आणि महागाई दर झालाय 5.64 टक्के. मागील दहा जानेवारीला संपलेल्या आठवड्यात दर 5.60 टक्के होता. गेले दोन आठवडे महागाई दर साडेपाच टक्क्यांवर कायम राहिला आहे. माल वाहतूकदारांच्या देशव्यापी संपामुळे सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या आणि त्यामुळेच महागाई दरात वाढ झाली आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. पण कालच पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात घट झालीय त्यामुळे महागाई दर लवकरच कमी होईल असाही अंदाज व्यक्त होत आहे.

close