आर्थिक संकटात नेतृत्त्वात कमतरता -रतन टाटा

August 28, 2013 2:41 PM1 commentViews: 559

ratan tata on pm28 ऑगस्ट : अर्थव्यवस्थेची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चाललीय यावर टाटा उद्योगसमुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी सरकारी यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. देशाला आज नेतृत्त्वाची गरज आहे ज्याचं नेतृत्त्व पंतप्रधान करत आहे. पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे देशाचं नेतृत्त्व करताना कमी पडत आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका टाटा उद्योगसमुहाचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी केलीये.

काही कारणांमुळे त्यांचे नेतृत्वगुण कमी पडलं असल्याचं मत टाटा यांनी व्यक्त केलं. मात्र त्यांनी पंतप्रधानांचं नाव घेतलं नाही. नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. तसंच त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्व गुणाची प्रशंसा केली.

पण राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या भूमिकेवर बोलण्यास टाळलं. आपल्याला नेतृत्वाच्या तुटीची समस्या भेडसावत असल्याचं आपल्या देशात सर्वसामान्य मत आहे. तुम्हालाही असं वाटतं? असा सवाल राजदीप सरदेसाई यांनी विचारला असता. मी आतापर्यंत काही नेत्यांचा आदर करत आलो, पण काही गोष्टींमुळे त्यांचे नेतृत्त्व कमजोर झाल्यासारखं वाटतं. या नेत्यांना बर्‍याच समस्या भेडसावत आहेत, पण ते धडाडीनं नेतृत्त्व करताना दिसत नाहीत असं उत्तर रतन टाटा यांनी दिलं.

  • Sandip Bhoi

    Sarkaar kaay karnaar… Sarkar ne tar desh vikayalach kadhala aahe…

    Aaata vatat artha tadnya Dr. Singh na economics theory subject madhye 90% milat asatil…….. baaki ajun kaay sangave.

close