आसाराम बापूंना मुदत वाढ नाहीच !

August 28, 2013 11:04 PM1 commentViews: 215

asram bapu28 ऑगस्ट : लैंगिक अत्याचार प्रकरणी हजर होण्यासाठी आसाराम बापूला मुदत वाढवून द्यायला जोधपूर पोलिसांनी नकार दिला. आसारामा बापूंना 30 ऑगस्टपर्यंत हजर राहावेच लागणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी बापूंविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून समन्स बजावली होती. मात्र बापूनी हजर राहण्यास टाळाटाळ सुरू केली होती.

दरम्यान, आसाराम बापूविरोधात लैंगिक छळाचा आरोप करणार्‍या मुलीच्या वडिलांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केलीय. आसाराम बापूला कडक शिक्षा करण्यात यावी अशीही मुलीच्या वडिलांनी मागणी केलीय.

तर आसाराम बापू यांच्या मुलानं नारायण साईनं मात्र पीडित मुलगी ही मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचा उलटा आरोप केलाय. आसाराम बापू यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचा दावाही साई यानं केलाय. दरम्यान, याच प्रकरणाच्या संदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंंदे यांची भेट घेतली.

  • sandip kamble

    konihi asala tari kayadhya samor konihi mota nahi jar asaram bapuni kay kele nahi tar te ghabatat ka yachya var vichar karnyachi vel ali ahe

close