राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसनं धुडकावली

January 29, 2009 12:38 PM0 commentsViews:

29 जानेवारी लोकसभा निवडणुकीत राज्याबाहेर युती करण्याची राष्ट्रवादीची मागणी काँग्रेसनं धुडकावून लावली आहे. युपीएतल्या घटक पक्षांशी फक्त राज्यपातळीवर युती होईल, असं काँग्रेसचे सरचिटणीस जर्नादन द्विवेदी यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसनं 16 जागा सोडाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीनं केली होती. राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसचं या निवडणुकीत युवकांना तिकीट देताना प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले. ज्या राज्यात ज्या ज्या पक्षाबरोबर युती आहे तिथे त्याच पक्षाबरोबर युती केली जाईल असं ते म्हणाले. या निर्णयामुळे राज्यातील युतीवर कोणताच परिणाम होणार नाही असं म्हटलं जातं.

close