हा सोनिया आणि राहुल गांधींचा कट, बापूची आगपाखड

August 29, 2013 2:46 PM4 commentsViews: 813

Image img_75842_nsk_1602_asaram_bapu_240x180.jpg29 ऑगस्ट : लैंगिक अत्याचार प्रकरणी आपल्याविरोधात राजकीय कट रचला जात आहे आणि हा कट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून रचण्यात आला अशी आगपाखड आसाराम बापूने केली. गेल्या साडेचार वर्षांपासून धर्मांतर करणार्‍यांना यांचा पाठिंबा मिळत आलाय असा आरोपही बापूंनी केलाय.

तसंच आपण जेलमध्ये जाण्याची आपली तयारी आहे, पण दगाफटका होण्याची भीती आहे. एखाद्यावेळेस जेवणातून विष देण्यात येईल अशी भीती बापूना वाटतेय त्यामुळे त्यांनी जेलमध्ये गेल्यावर अन्न-पाणी घेणार नसल्याचं सांगितलं. मात्र बापूच्या या ‘वाणी’वर काँग्रेस नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला.

बापू पळवाटा शोध आहे अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. बापूंविरोधात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय. त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आली असून समन्सही देण्यात आलाय बापूला 30 ऑगस्टपर्यंत पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.

 • Sachin Nalawade

  Politician asta tar vishwas pa thavla asta….pan baba kadun hey barabor nahi watat.

  • Sandip Bhoi

   Mala vaait vatate ki… tumhi politician la kahihi karayachi janu sutach dili aahe…
   kuthala hi vaait krutya karayacha … ha kaay politician cha janma siddha adhikaar aahe ka?… Aapali manasikata nakkich badalali pahije.

 • Kalpana Charudatta

  भेटायला आलेल्या भक्त महिलांवर अत्याचार करणे हे आसाराम बापूंचे कृत्य नवे नाही. वृध्द वयाचा गैर फायदा घेऊन मुली-बाळीचा गैरफायदा घेणारे अनेक वृद्ध असतात. आसाराम तर काय मान्यवर संत.
  असरामच्या समूहाने- त्यात इंडिया टुडेचाही समावेश आहे – आसाराम बापू आणिमहात्मा बापू ( गांधी) या नावांचे साधर्म्य साधून असरामला देशाचा पिताच करून टाकला.
  पुरुषांमधील हे विकृती मरेपर्यंत संपत नाही.
  आय बी एन लोकमतने खरतर या गोष्टीचा पुरेपूर समाचार घ्यायला हवा.

 • Sham Dhumal

  आसाराम बापूंच्या ठिकानी सामान्य आरोपी असता तर त्याची पोलीसांनी
  काय अवस्था केली असती?
  खरचं कायदा सर्वांना समान आहे?
  आसाराम बापूंना कायद्यातून पूर्ण सूठ दिली आहे का?

close