कोण आहे यासीन भटकळ?

August 29, 2013 2:49 PM0 commentsViews: 739

29 ऑगस्ट : इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक, कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला आज जेरबंद करण्यात आलं. इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यासिनला बिहारमध्ये नेपाळच्या सीमेवरुन सौनाली या गावातून अटक करण्यात आली. पुणे, मुबंई, हैदराबाद, बंगळुरू, सुरत, वाराणसी या शहरांमध्ये झालेल्या 10 बाँबस्फोटांमध्ये यासिन भटकळ आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग होता. गेली पाच वर्षे पोलीस त्याच्या मागावर होते.

– बंदी असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक
– मूळ नाव : सय्यद अहमद जरार सिदीबापा
– मूळ गाव : कर्नाटकातील उत्तर कन्नड
– NIA च्या मोस्ट वाँटेड यादीतला महत्त्वाचा अतिरेकी
– हैदराबादच्या दिलसुख नगरमधल्या दुहेरी बॉम्बहल्ल्यात सहभागी
– 2010 : बंगलोरमधील चिन्नस्वामी स्टेडियम स्फोटात सहभाग
– दिल्ली हायकोर्टात 7 सप्टेंबर 2011 ला झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग
– मुंबईत 7/13 ला झालेल्या स्फोटातील महत्वाचा आरोपी
– पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला महत्त्वाचा आरोपी
– 2012 ला जंगली महाराज रोडवर झालेल्या स्फोटात सहभाग

close