दाभोलकर खून प्रकरणी ‘सनातन’च्या साधकाला सोडलं

August 29, 2013 3:13 PM1 commentViews: 1081

sanatan29 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात ताब्यात घेतलेला सनातनचा साधक संदीप शिंदे याला पोलिसांनी सोडून दिलंय. संदीप शिंदे याला बुधवारी गोव्यातून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

त्यानंतर त्याला चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं. त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणातले कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत, त्यामुले संदीप शिंदेला सोडून देण्यात आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संदीप शिंदे याला गोव्यातून सनातन प्रभात संस्थेच्या रामनाथी येथील आश्रमातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात घेण्यात आलं होतं. पुणे पोलीस तपास पथकाच्या प्रमुख गीता भगवाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली होती.

यावेळी सनातनचे विश्वस्त विरेंद्र मराठे तसंच सनातनाचे वकील ऍड. ताकभाते उपस्थित होते. संदीप शिंदे गेली चार वर्षे रामनाथी आश्रमात साधना करत होता. तो मुळचा पुण्याचा आहे. पोलिसांनी अधिक चौकशीसाठी संदीपला पुण्याला आणलं आणि आज सोडून दिलं.

 • राज वाघापुरकर

  आय बी एन लोकमतचे अभिनंदन नाहीतर मिडीयातले डॊमकावळे हे फ़क्त ताब्यात घेण्याच्या बातम्या घेतात , सोडल्याच्या बातम्या नाही देत .
  http://www.ibnlokmat.tv/?p=99376

  (टीप : आम्ही सनातनचे साधक अथवा कार्यकर्ते नाही आहोत , सकाळ सकाळी हास्याने सुरवात करायला आम्हाला आवडत असल्याने महाराष्ट्रात असल्यावर आम्ही स्वेच्छेने सनातन प्रभात दैनिक वाचतो . महाराष्ट्राबाहेर असल्यास आंतरजालावर वाचतो .

  बातमी टाकण्याचे निमित्त हे की जर साधक तरुण होतकरु असेल तर त्याची फ़ुकट बदनामी होते .
  पद्मश्री विजेते लक्ष्मण माने यांच्याही अटकेचा असाच गाजावाजा झाला पण त्यांना बेल मिळाली हे कुणीही कव्हर केलेले नाही .

  )

close